Skip to content

रंगले रे Rangle Re Marathi Lyrics Song PDF Download | New Marathi Song

रंगले रे लिरिक्स इन मराठी

साथ दे ना सात जन्माची,
ईच्छा हाय रं ह्या भोळ्या मनाची
चल चल बांधूया गाठ पिरमाची रं,
हो राजा तू माझा मी होईल मी राणी रं.

कळत नाही वळत नाही
ईशक तुझं
खूळ्यावानी येड
तुला माझं लागलं

रंगले रे तुझ्या प्रेमात अशी रे मी
माझं काळीज धडधडतंय

रंगलो गं तुझ्या प्रेमात असा रे मी
माझं काळीज धडधडतंय

रातीला सपान
तुझंच पाहिलं
पाहताना राजा
अधुरं राहिलं
नजरेचा तीर करी उरामंदी घाव
डोरलं तु बांधून रं होना माझा राव

जादु अशी पिरमाची
नशा जशी होई
सांगू कशी तुला मना कळनाचं काही
येड्या पिसा ह्या मनाला तहान भूक नाही
वाटेवरी जाउनी त्या वाट तुझी पाही

पाहूनी रुप तुझं राणी
सुटलया ईश्काचं वारं
खळी हि गोड तुझ्या गाली
हसू करी काळजावं वार

निळ्या निळ्या सागराचा हो रे तू किनारा
झाले रे लाट मी तुझी
ओढ लागलिया मनी
हो तू धनी माझा
कारभारीण रं मी तुझी

पाहू कशी तुला मी
बोलू कशी तुला मी
समजून घे ना इशारा
जोडी तुझी माझी हि
इश्कानं रंगली
नको लागू दे नजरा

इसरु कसा मी तुला राणी
तुकडा तू ह्या गं जिवाचा
नखऱ्याची नार तू माझी
साथ देईन जन्माची

Rangle Re Lyrics Song Download PDF

Rangle Re Lyrics Song Download Notepad

Song : Rangle Re
Singers : Sonali Sonawane & Rajesh Aher
Lyrics :- Harsh Dawre
Music By : Rajesh Aher & Robin Gangawane
Music Arrangement :- Rajendra Gajanan Salunke

Rangle Re Marathi Song