Skip to content

प्रेमाची धून | Premachi Dhun Song Lyrics in Marathi – Harshavardhan Wavre | Marathi Song

Premachi Dhun Lyrics in Marathi

|| प्रेमाची धुन ||

पाहताना मी तुला हरवून जातो भान हे

बोलण्याची आस पण अबोल मन हे घाबरे |२|

मन थांबते मन चालते मन बिलगण्या तुझ धावते

तुझीया दिशेने चालता मन अंतरातून लाजते

तुझ्या मागे मन असे धावते

जशी प्रेमाची धुन वाहते { धॄ } |३|

जे तुला सांगायचे ते

ठेवले डोळ्यात मी |२|

होऊदे नझरा नझर घे

सारे आज तू जानूनी

ना बोललो मी कधी तुला माझ्या मनातील प्रित हि

का रोखते मला अशी वेड्या जगाची रित हि

मन थांबते मन चालते मन बिलगण्या तुझ धावते

तुझीया दिशेने चालता मन अंतरातून लाजते

तुझ्या मागे मन असे धावते

जशी प्रेमाची धुन वाहते |३|

सजविण्या तुझ आनीले

मी रंग सारे चोरूनी |२|

केशरी गालांवरी अन्

गुलाबी ओठांवरी

जा रंगूनी रंगात घे तू इंद्रधनू तू ओढूनी

मी तुला रंगवून दयावे स्वप्न हे माझ्या मनी

मन थांबते मन चालते मन बिलगण्या तुझ धावते

तुझीया दिशेने चालता मन अंतरातून लाजते

तुझ्या मागे मन असे धावते

जशी प्रेमाची धुन वाहते |४|

Music Video of Premachi Dhun

Title – Premachi Dhun (प्रेमाची धून)
Singer – Harshavardhan Wavre
Composer – Vicky Adsule – Rohit Nanaware
Lyricist – Swapnil Jadhav
Label – Chetan Garud Productions Pvt Ltd

Marathi Song