लय गुणाची हाय लिरिक्स इन मराठी
लय गुणाची हाय पण कुणाची हाय
सांगा कुणाची हाय ही पोर
हिच्या मागं मागं लागून माझ्या जीवाला लागलाय घोर
हिच्या मागं मागं लागून जिवाला लागलाय घोरं…||धृ||
पायात रुनुझुनू पैंजण हिच्या
कानात फुलावानी डुल…
वेणीला मोगऱ्याचा गजरा आणि
लाल लाल गुलाबाचं फुल…
लय नखऱ्याची हाय झुळूक वाऱ्याची हाय
झुळूक वाऱ्याची हाय ही पोर…
हिच्या मागं मागं लागून माझ्या जीवाला लागलाय घोरं
हिच्या मागं मागं लागून जिवाला लागलाय घोरं…||१||
किरकिर रात मन माझं हे गात त्यात
काकणाचा किन किन आवाज
आजवर ध्यास जिचा होता उरी
हसून पाहिलं तिनं आज…
जरा चिडकीच हाय पण भारीच हाय
अरे भारीच हाय ही पोर
हिच्या मागं मागं लागून माझ्या जीवाला लागलाय घोर
हिच्या मागं मागं लागून जिवाला लागलाय घोरं…||२||
बाप खासदार भाऊ आमदार हिचा
माझं काय शेतावरती रहानं
हिच्या घरी मऊ मऊ बिछाना माझं
भुईवर तसच पडणं…
लेक त्या घरची हाय सून ह्या घरची हाय
सून ह्या घरची होणार ही पोर
हिच्या माग माग लागून माझ्या जीवाला लागलाय घोरं
हिच्या मागं मागं लागून जीवाला लागलाय घोरं…||३||