जगण्याला पंख फुटले लिरिक्स इन मराठी
काळजाचं सूप झालं
आरशाला रूप आलं
जगण्याला पंख फुटले
ये माझ्या… जगण्याला पंख फुटले
रान सारं गाण झालं
मेणावानी मन झालं
जगण्याला पंख फुटले
ये माझ्या… जगण्याला पंख फुटले1
हे फुलासंग नाचताना
रंग सारे वाचताना
हे डोळ्यामंदी तूच साचली
पैजणांच वाजणं हे
जीव घेई लाजणं हे
पापण्यांची फुलं नाचली
पाखरांशी बोलताना
वाऱ्यावरी चालताना
जगण्याला पंख फुटले
ये माझ्या… जगण्याला पंख फुटले
अंग अंग खेटताना,आभाळ हे पेटताना
गजर्याला लाज वाटली
झुळ झुळीचे सुर झाले हातांचेच हार झाले
ओठांची ही कुपी भेटली
देह तडीपार झाला,ढगावरी स्वार झाला,
जगण्याला पंख फुटले
ये माझ्या… जगण्याला पंख फुटले