आई बाबांना मनवशील का
सजणा माझं ऐकना माझा तुझ्यावरी पुरा भरवसा हाय.. (२)
सोनू नको ,जानू नको, म्हणू नको मला बाबू
तुच माझ्या दिलाचा एकच लाडाचा लगीन आपन करू -२
सातजन्माचा हात आपण धरू
तुझा माझा संसार होईल सुरू
सांग माझ्या सोबत येशील का??
माझ्या आई बाबांना मनवशील का??llध्रु ll
तुझ्या सोबत मी वाजत गाजत घरात आलीया सजणा…
मला सापान पडलंय रातीला अन झोपही ही तुझ्याविना येईना..२
सपनाच्या झर्यात जाऊया जोरात
लगीन तू माझ्याशी करशील ना
माझा सपान हे पूर्ण तू करशील का??
आधी आई बाबांना मनवशील का??||१||
हो हो हो…….
थांब राणी थांब अशी घाई ही बरी नाय
थोडा वेळ तू मला ही देशील का?
तुझा सपान हाय लय मोठं राणी आधी मला तू समजुन घेशील का?
नाही बंगला माझा नाही गाडी माझी कशी हौस तूझी आता पूर्वेन मी
मोठ्या बापाची लाडाची लेक कोलीवड्याची
भारी जोडी आपली बनवेन मी
मला कायमची साथ तू देशील का ?? माझ्या आई बाबांना मनवशील का??||२||
मला बंगला नको मला गाडी नको तुझ्या मनाची दौलत हवी मला
मी तुझी राणी तू राजा बनून तुझ्या दीलाचा बंगला हवाय मला
तू दिलदार हाय लय मायाळू हाय
मी नजर कोणाची लागू देणार नाय
अशी जोडी आपली मला करायची हाय
मला मिरवत घराला नेशील का??
माझी आई बाबांना मनवशील का??||३||